अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
|---|---|---|
| १७.८ | योजनेचे नांव | महिला किसान योजना |
| २ | योजनेचा प्रकार | केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना |
| ३ | योजनेचा उद्देश | अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. |
| ४ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. |
| ५ | योजनेच्या प्रमुख अटी |
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. |
| ६ | दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप | या योजने अंतर्गत ज्या महिलांच्या नावे शेत जमिनीचा सात/बाराचा उतारा आहे किंवा पतिपत्नी या दोघांच्या नावावर सात/बारा उतारा आहे अथवा पतीच्या नावांवर सात/बारा उतारा आहे व त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञा पत्रा-ारे आपल्या पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी या शेतजमिनीच्या नांवे कर्ज मंजूर करुन घेण्यास तयार असेल अशा महिला लाभार्थीस रु.५००००/ पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये रु.१००००/ अनुदान व उर्वरित रक्कम रु.४००००/ कर्ज स्वरुपात ५ टक्के व्याज दराने मंजूर करण्यांत येते. सदर कर्ज हे फक्त शेतीसाठी अथवा शेतीपूरक व्यवसायासाठीच देण्यांत येते. |
| ७ | अर्ज करण्याची पध्दत |
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे. |
| ८ | योजनेची वर्गवारी | रोजगारनिर्मिती |
| ९ | संपर्क कार्यालयाचे नांव | सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे. |
महिला किसान योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)
| अ.क्र. | वर्ष | खर्च | लाभार्थी |
|---|---|---|---|
| १ | २०१२१३ | ४३.५० | ८७ |
| २ | २०१३१४ | २७.२० | ५५ |
| ३ | २०१४१५ | १८.४० | ३८ |
No comments:
Post a Comment