शासन आपल्या दारी योजना 2023 संपूर्ण माहिती । Shasan Aplya Dari Yojana Registration

 नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण शासन आपल्या दारी योजना 2023 संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शासन आपल्या दारी योजना लाभ , उद्दिष्ट्यलाभ प्रक्रिया, शासन आपल्या दारी योजना GR, शासन आपल्या दारी योजना ऑनलाईन अर्ज Online Registration, Shasan Aplya Dari अंतर्गत येणाऱ्या योजना कोणत्या? Shasan Aplya Dari Yojana अंतर्गत राबवले जाणारे उपक्रम आणि कार्यक्रम संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे


शासन आपल्या दारी योजना 2023 | Shasan Aplya Dari Yojana

राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. समाजातील सर्व तळागाळातील घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. या अभियानाचा नुकताच सातारा जिल्हात पाटण तालुक्यात 14 मे 2023 रोजी शुभारंभ करण्यात आला होता. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या अभियानात मुख्यमंत्री महोदयांच्या मुख्य उपस्थितीतभव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी 22 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे.


शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक कल्याणाकरी योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना लाभ मिळावा या हेतूने शासनातर्फे हाती घेण्यात आलेले ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या 11 महिन्यांच्या कालावधीत सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले असल्याचे सांगितले. तसेच ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचे काम व्यापक स्तरावर राबविण्यात येत असून यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित आहे. या अभियानाच्या यशासाठी 16 हजार योजना दूत नेमले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यांत जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु केले आहेत.

  • भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून एकूण 27,00,000 नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
  • यासाठी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
  • कमीत कमी कालावधीत विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यपद्धतीदेखील निश्चित केली गेली आहे.
  • नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहेत.
  • सर्वसामान्य नागरिकांना अशा योजनांची माहिती देखील नसते. अश्या नागरिकांना या अभियानाअंतर्गत शासकीय योजनांचा लाभू शकेल.
  • राज्यातील सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी किंवा अर्जासाठी इतर कागदपत्रे आणि दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागायचे. या सर्व गोष्टीतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारतर्फे ‘ शासन आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबविला जात आहे.
  • या अभियानाअंतर्गत नागरिकांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे आणि त्यासाठी आवश्यक विविध कागदपत्रांची पूर्तता देखील करून दिली जात आहे.
  • जिल्ह्यात सुमारे 5 हजार 457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.
  • या शासन अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या थेट दारी येत आहे.

शासन आपल्या दारी योजना लाभ प्रक्रिया

  • शासकीय अधिकारी आणि कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येऊन आपल्याला विविध योजनांची माहिती देतील.
  • त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतील.
  • या सगळ्यांची माहिती आणि त्याची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार असल्याने अर्जदारांना इतरत्र कुठे जावे लागणार नाही आणि संबंधित विभागाच्या योजनेचा लाभ घेता येईल.

शासन आपल्या दारीसोबतच विविध उपक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे.

  1. रोजगार मेळावे
  2. आरोग्य शिबिर
  3. रक्तदान शिबिर
  4. दिव्यांगांना साहित्याचे वाटप
  5. कृषी प्रदर्शन
  6. शेतकरी ते ग्राहक थेट बाजार

यांच्या आयोजनासोबत नवीन मतदारांची नोंदणीही या ठिकाणी केली जाईल. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नागरिक अशी प्रशासन प्रणाली राबविण्यावर भर दिला आहे. या घोषणेचे प्रतिबिंब या अभियानात स्पष्टपणे दिसते आहे. यासाठी आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयाशी आपण संपर्क साधावा हे अभियान यशस्वी करण्यास मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावे. हे अभियान सर्वांना घेऊन यशस्वी करायची आहे


मुख्यमंत्री सचिवालयाचे यावर पूर्ण नियंत्रण आहे. महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून नागरिकांना अनेक योजनांचा लाभ घेता येणार . या अभियानाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सीएससी, ‘एमएससीआयटी’ कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्समधील स्वयंसेवकांची मदत घेऊन नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.

नागरिकांना ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जोडधंदे करण्यासाठी शासनातर्फे भरीव निधीची तरतूद देखील करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

शासन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ कधी झाला?

अभियानाचा नुकताच सातारा जिल्हात पाटण तालुक्यात 14 मे 2023 रोजी शुभारंभ करण्यात आला होता.

शासन आपल्या दारी योजना नोंदणी पोर्टल कोणते?

महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून नागरिकांना अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे.

शासन आपल्या दारी योजना 2023 नोंदणी करण्यासाठी कुठे जावे लागेल?

अभियानाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सीएससी, ‘एमएससीआयटी’ कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्समधील स्वयंसेवकांची मदत घेऊन नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.

शासन आपल्या दारी योजना नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे?

नागरिकांना ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे


No comments:

Post a Comment

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2024 पहा संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या हितासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजन ा (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने स...